पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज सोलापूर जिल्हा परिषदेला भेट
सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामात माहिती तंत्रज्ञानाची भर पडली आहे. मालमत्ता अभिलेख, मानव संसाधन व्यवस्थापन आणि १०० दिवसांच्या मोहिमेच्या कामात माहिती तंत्रज्ञानाची भर पडल्याचे पाहून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सीईओ कुलदीप जंगम यांच्या कामाचे कौतुक केले.
पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.