बंद

    दुर्धर आजार अर्थसहाय्य योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    जिल्हा परिषद सेस अंतर्गत वैयक्तिक लाभ दुर्धर आजार (असाध्य रोग)अर्थ सहाय्य योजना हि ग्रामीण भागातील जनतेसाठी असुन या योजनेत ह-दय रोग,मुत्रपिंड विकार व कॅन्सर या तीन आजार असलेल्या रुग्णांना लाभार्थी म्हणुन समावेश करण्यात आलेला आहे.सदर आजार पिडीत रुणांना प्रत्येकी रक्कम रुपये 15000/-(पंधरा हजार फक्त)आर्थिक मदत म्हणून देणेत येत आहे.सदरचा लाभ हा लाभार्थीला जिवनात एकदाच दिले जाते.

    लाभार्थी:

    या योजनेत ह-दय रोग,मुत्रपिंड विकार व कॅन्सर असलेल्या रुग्णांना लाभार्थी म्हणुन समावेश करण्यात आलेला आहे.लाभार्थी हा स्थानिक ग्रामिण भागाचा असणे बंधनकारक आहे.

    फायदे:

    अर्थसहाय 15000/- रुपयापर्यंत

    अर्ज कसा करावा

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मा जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.सोलापूर यांचा नावाने लागणारे कागद पत्र घेवुन अर्ज करावा.सदर योजनेसाठी लाभ घेणेकामी लागणारे कागदपत्र खाली प्रमाणे आहेत.
    1)लाभार्थी हा ग्रामीण भागाचा रहिवाशी व हयात असल्याच दाखला(तलाठी/ग्रामसेव/मा.तहसिलदार यांचा दाखला आवश्यक)
    2)शासनाने प्राधिक्त केलेल्या रुग्णालयाकडून संबधित आजार असल्याबाबत रुग्णांचे नांवेप्रमाणपत्र.
    3)रुग्ण हा अल्प भुधारक,भुमीहीन,दारिद्ररेषेखालील अथवा स्वतंत्र सैनिक असल्यास प्रधान्य किंवा कमी उत्पन्न असल्याचा दाखला(मा.तहसिलदार यांचा दाखला आवश्यक).
    4)100/-बाँन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र मा.जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.सोलापूर यांचा नावाने यापुर्वी सदर योजनेचा लाभ किंवा कोणतेही शासनाचे सदर विषयी लाभ घेतलेले नाही असे प्रतिज्ञापत्र मा. तहसिलदार यांचाकडून करुन देणे.
    5)रेशन कार्ड,आधार कार्ड,व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत.
    6)मा.जिल्हा परिषद सदस्य यांचे सदर लाभ मिळणेकामी शिफारस पत्र.
    7)मा.वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र किंवा मा.तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती यांचे पत्र.

    संचिका:

    New Doc 02-28-2025 17.16 (542 KB)